श्वानपालनाच्या अटी व शर्ती


    • १.श्वान मालकाने आपल्या श्वानास महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषदे अंतर्गत नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून अँटी रेबीज प्रतिबंधक लस देणे बंधनकारक आहे.
    • २. श्वान मालकांने लसीकरण नोंद लेखाची (Vaccination Schedule) मागणी केल्यास सादर करणे बंधनकारक आहे.
    • ३.प्रत्येक श्वान मालकाने त्याच्या परिसरामध्ये आपले श्वान नियंत्रणात ठेवावे तसेच श्वानास सार्वजनिक ठिकाणी खुले न सोडता साखळीने बांधून आपल्या ताब्यात ठेवावे.
    • ४. आपले श्वान कोणत्याही संसर्गजन्य आजाराने त्रस्त असेल किंवा पिसाळलेले असेल तर अशा श्वान मालकाने त्वरीत श्वानावर पाळीव कुत्र्याच्या अथवा शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा नोंदणीकृत पशुवैद्यकांकडे उपचार करून घ्यावेत
    • ५.श्वान मालक बदलल्यास नवीन श्वान मालकाच्या नावाने परवाना घेणे बंधनकारक आहे.
    • ६. श्वान बेपत्ता झाल्यास किंवा श्वान मृत्यमुखी पडल्यास संबंधित श्वान मालकाने सदरची बाबतची माहिती महापालिकेच्या निर्देशनास आणावी तसेच दिलेला परवाना रद्द करावा.
    • ७. परवाना नुतनीकरणाच्या वेळी जुना परवाना सादर करणे आवश्यक आहे.
    • ८. सदरच्या परवाना अहस्तांतरणीय (Non Transferable) आहे
    • ९. श्वान परवाना शुल्क महानगरपालिकेत भरणा करणे बंधनकारक आहे.
    • १०. सोसायटी मधील पाळीव श्वान मालकांना सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
    • ११.श्वान मालकाने आपले श्वान पनवेल महानगरपालिका हद्दीतील रस्ते, पदपथ, उदयान, मोकळी मैदाने इत्यादी सारख्या सार्वजनिक ठिकाणी विष्ठा करुन घाण करणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अन्यथा आपणांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम तसेच घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ (MSW Rule २०१६) अन्वये दंडात्मक कारवाई करणेत येईल.
    • १२. परवाना धारकास श्वान विष्ठेची योग्यरीत्या विल्हेवाट लावणेसाठी आवश्यक ती साधने संबंधीत श्वान मालकाने जवळ बाळगणे बंधनकारक आहे.
    • १३. Animal Welfare Board of India (AWBI) ने वेळोवेळी निर्मित केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधित श्वान परवाना धारकास बंधनकारक आहे.
      • सुचना
        • १. श्वान कराची मागणी करणाऱ्या अनाधिकृत व्यक्तीपासून सावध राहवे.
        • २. श्वान पथकाने आपले श्वान पकडल्यास तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास परवान्यासह संपर्क साधावा.
        • ३. श्वान पकडल्यानंतर मालकास हस्तांतर करेपर्यंत देखभालीचा व वाहतूकीचा खर्च संबधित मालकाकडून वसूल पात्र राहील.